STORYMIRROR

Mala Malsamindr

Others

3  

Mala Malsamindr

Others

दिवस

दिवस

1 min
244

आजचा दिवस 

म्हणजे एक रंगमंच आहे 

त्या रंगमंचाच्या रंगभूमीवर 

तू मला भेटला आहे 


माझ्या नजरे मध्ये तू

अलगद साठवला आहे 

तुझा चेहराआजच्या दिवशी

माझ्या मनामध्ये साठवला आहे 


आणि आजच्या दिवशी तुझे

नाव माझ्या ओठावर तरंगत आहे

माझ्या रोमा रोमामध्ये तुझे

 प्रतिबिंब साठले आहे

 

तुझ्या प्रेमाने मी बहरली आहे

आपल्या संसाराच्या बागेमधली

हया दिवशी अनोमाची वेल फूलली आहे

आणि आयुष्य फुल खूलले 


आयुष्याच्या ह्या वळणावरी

आयुषने या दिवशी भूमिका बजावली 

की त्याच्या दुडूदुडू धावल्याने

माझ्या चेहऱ्यावर आली लाली 


आयुष्याच्या या दिवसाने

मातृत्वाची जाणीव मला झाली

अनोमाने मला बोबड्या बोलाने

मम्मा अशी जेव्हा मला साद घातली 


जीवनातली सर्व दुःख 

आज नाहीशी झाली

अंगातली दुःखाची काहीली

आजच्या दिनी मिटली


तुझ्या ममतेने

आज नावून मी निघाली 

तुझ्या प्रेमाची जनू 

धुंदी मला चढली


एकमेकांना खूप - खूप 

या दिनपासून जपायचे आहे

वेगवेगळ्या भूमिका ही

साकारायच्या आहे 


करतोस तू किती वन - वन

दिले मला तु सुखाचे क्षण

किती जपतोस माझे मन

यालाच म्हणतात का सूखी जीवन


जीवनाच्या रंगमंचावर मलाप्रत्येक

भूमिका पार पाडायची आहे

त्या पार पाडण्यासाठी तुझी 

साथ मला मिळत आहे 


त्यामुळे मी नोकरी करून

घर संसार सांभाळून पत्नी,आई, बहिण

अशा भूमिका पार पाडून

स्वस्थ मी दिन रत्र राहत आहे 


ह्या दिनी

तुझ्या साथीने मिळतो आहे मान

बाळगते मी अभिमान 

माझ्या इतके कुणी नाही मीच खरी भाग्यवान.


Rate this content
Log in