दिवस गुलाबी थंडीचे
दिवस गुलाबी थंडीचे
तिला भेटण्यासाठी तो वेगळ रुप घ्यायचा.
वेगळ्या रुपात जाऊन तो तिला भेटायचा.
वरुनाच्या रुपात तो तिला भेटल्यावर
त्याच्या सहवासात ती सौभाग्यवती सारखी हिरव्या शृंगारात नटली होती.
अन् त्याच्या मिलनात ती सुखावली होती .
आता त्याचा परतीचा काळ आला होता.
अन् त्याला तो विरह नको होता.
म्हणून त्यान पुन्हा एक रुप धारण केल
शीतलतेच
अन् पुन्हा तिचात तो सामाउण गेला.
त्याच्या त्या रुपानं ती रम्य झाली.
तिच्यात गारवा भरला होता.
तिच्यावर होणारी प्रभात दाट धुक्यात पुष्पगुच्छा सारखी मोहक वाटत होती.
तिच्या सौदर्यावर दव बिंदु दाटले होते.
दवाचे थेंब कोवळ्या किरणात वज्रा
सारखे चमकत होते.
जनु तिच्यावर व्रजाची खान वाटत होती जस जसा रवी नभात येत होता
तस तशी ती सौंदर्यान माखत होती
तिन्ही प्रहार ती शित झाली होती.
तिचा प्रत्येक क्षण गारव्यात बहरुन गेला होता.
कारण त्यान तिजसाठी
दिवस गुलाबी थंडीचे आणले होते.
