STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

4  

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

दिवस असेच हे सरायचे

दिवस असेच हे सरायचे

1 min
229

सुखाचे की दुःखाचे

ते कधीच न मोजायचे

दिवस असेच हे सरायचे


बालपणी खेळण्यात

सवंगड्यासह पळण्यात

मौजमजा करण्यात

बालपण हे संपायचे

दिवस असेच हे सरायचे


तारुण्यात होई वेडा

मित्रांचा घेऊन गराडा

कमवायचे जरी थोडा

मौजमस्तीत फिरायचे

दिवस असेच हे सरायचे


वार्धक्यात चिंतन करे

बेरीज वजा काय उरे

जिवंत असूनी दूर सारे

वेळ परत येत नसायचे

दिवस असेच हे सरायचे


ज्या वेळेला ते काम

त्यातच असतो राम

तेंव्हाच होईल नाम

जीवन सार वेळी कळायचे

दिवस असेच हे सरायचे


Rate this content
Log in