STORYMIRROR

Dattatraygir Gosavi

Others

2  

Dattatraygir Gosavi

Others

दिवाळी

दिवाळी

1 min
52

कुणा इवानाचा सोस

असे डोईवर मोळी

अन्नासाठी दाहीदिशा

करी साजरी दिवाळी।।धृ।।


नसे कुणीही वंचित

असे भाळी पत्रावळी

ज्याचे त्याचे ते संचित

मिळे तसी खानावळी।।१।।


देवा गोपाळ मुहूर्ती 

काढी रांगोळी माऊली

होई  सडा सारवन

अंगा उटणे लावली ।।२।।


कडे लोट तो कचरा

स्वच्छ घरेंदारे केली

रंग -रंगोटी घरास 

आपापले परी केली।।३।।


स्वच्छ सदरा घातला

निट -नेटके  धोतर

घडी मोडी पातळाची

चोळी बांगडी सासर।।४।।


सुख समृद्धी चे दान

देइ भरून ओंजळी

येइ आनंदा उधाण

प्रकाशाची मांदीयाळी।।५।।


आज दिवाळ सणांला

केली पुरणाची पोळी

सुखी समाधानी आज

केली साजरी दिवाळी।।६।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन