दिवाळी
दिवाळी
1 min
167
करू कशी साजरी
मी रे माझी दिवाळी
झळा अजूनही ती
देते वेदना पावसाळी
मेहनतीच माझ्या रे
पिकच नाही उरलेलं
कसा करू सन साजरी
दिवाळ सारं निघलेलं
कोप आम्हांवरी निसर्गाचा
दुःख सदा लिहिलेलं भाळी
उध्वस्त झालेल सारं, त्यात
कशी करू साजरी दिवाळी
दिवाळीचं रे दिवाळं
केलंय निसर्गानं सारं
कसला हा सन आम्हा
मनी सुटलेलं वादळ वारं
