Prashant Kadam

Others

4.1  

Prashant Kadam

Others

दिस श्रावण मासाचे !

दिस श्रावण मासाचे !

1 min 12 1 min 12

झाडांच्या हिरव्या रंगाने खुलती

शुभ्र टपो-या थेंबानी सजती

झाडांच्या हिरव्या रंगाने खुलती

शुभ्र टपो-या थेंबानी सजती

दिस श्रावण मासाचे, रिमझिम सरींचे

सौंदर्य पहा कसे सहज खुलवते, आपल्या सृष्टीचे

दिस श्रावण मासाचे, रिमझिम सरींचे

सौंदर्य पहा कसे सहज खुलवते, आपल्या सृष्टीचे

दिस श्रावण मासाचे,

जसे आकाशी गगनात ईन्द्रधनू बहरते

किरणांतील रंगात जणू सप्त रंग मिसळते

लख, लखते, चमकते का मनोहारी दिसते

पक्ष्यांनाही आभाळी ते पहा कसे मोहवीते

नभ दूर होवूनी कधि सोनेरी चम चमते 

अन् आभाळ नभांनी क्षणात भरूनी येते

दिस श्रावण मासाचे, रिमझिम सरींचे

सौंदर्य पहा कसे सहज खुलवते, आपल्या सृष्टीचे

दिस श्रावण मासाचे, रिमझिम सरींचे

सौंदर्य पहा कसे सहज खुलवते, आपल्या सृष्टीचे

दिस श्रावण मासाचे,

संतत बरसते सर कधि, रिप रिप ती करते 

कधि ऊन्हात पिवळया अलुवार ती सर सरते

गडद नभांतून आक्रंदून मुसळधार कोसळते 

चरा चराच्या सौंदर्यावर, मन ही मग भुलते 

वा-या वरती स्वैर होवूनी ते ही भिर भिर ते

कधि जल धारांनी चिंब होवूनी प्रफुल्लित होते

दिस श्रावण मासाचे, रिमझिम सरींचे

सौंदर्य पहा कसे सहज खुलवते, आपल्या सृष्टीचे

दिस श्रावण मासाचे, रिमझिम सरींचे

सौंदर्य पहा कसे सहज खुलवते, आपल्या सृष्टीचे

दिस श्रावण मासाचे..

Rate this content
Log in