Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Poonam Wankar ( पूरवा )

Others

3  

Poonam Wankar ( पूरवा )

Others

दिन सोन्याचा

दिन सोन्याचा

1 min
303


तिरंगी झेंडा पहा फडफडे

जय जयकार बोला

आज मिळूनी या बंधुंनो 

करू दिन सोन्याचा साजिरा..


पुन्हा आढावा घेऊ नव्याने 

त्या विर आहुतींचा 

स्वतंत्र करण्या भू-मातेला

ज्यांनी प्राण आपुला त्यागीला..


कुणी गमाविला पुत्र आपुला

उतारवयाची काठी

कुणाचा तो बाप होता

तर होता कुणाचा धनी..;

शतशः वंदन त्या मातेला

गर्व त्या विधवेचा करू

न ढाळता अश्रू ज्यांनी

ठेविले, वंदे मातरम्! वंदे मातरम्! सुरू...


जन्मले नसते आंबेडकर

राज्यघटना निर्मिली नसती

न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता

कुणास कळली नसती..;

त्यांच्या स्वप्नातील भारत

चला मिळूनी निर्माण करू

स्वत:त जागवू लाखो भगतसिंग

सुखदेव, राजगुरू...


सत्याची बंदूक घेऊन हाती

भ्रष्टाचाराचा नाश करू

पुन्हा एकदा या मातेला

साऱ्या पाशातून मुक्त करू...


लहरवू या तिरंगा आपुला

प्रत्येक कडे कपारी

पुन्हा गर्जू जय-जयकार क्रांतीचा

सळसळत्या रक्तांमधुनी...


भविष्य आपण या मातेचे

अभिमान उरी बाळगू

'वागू सत्याने' ही शपथ घेऊनी

दिन सोन्याचा साजिरा करू...!!


Rate this content
Log in