STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

4  

Meenakshi Kilawat

Others

दिखाव्याची दुनिया

दिखाव्याची दुनिया

1 min
427

नात्यांमधली ही दुनियादारी

पाहूनीया विटला रंग नात्यांचा,

दिखाव्याच्या या षट्कारात 

दिसतो जिव्हाळा फक्त व्यवहाराचा....


गैरसमजाच्या या फटकारात 

जेंव्हा हा किल्मीष मधे येतोय, 

तेंव्हा, अनादरातून दुभंगलेली मने,

 मी ,जाळ्यातून ओढूनच आणतोय......


स्वार्थाच्या या अंधत्वाने जेंव्हा

मनशांतीस सुरुंग लागत असतोय ,

आणि नाते संबंध त्वेषातून दुरावत असतात,

तेंव्हा संस्कार दाखवून मी बेफाम वारे क्षमवितोय...

असतय मी-पणाचं अस्र हे अती भारी

तेंव्हा, नाही तिमीर उधळत क्रंदनकारी,

सौम्य प्रकाशाचे हे हळूवार बंधण ,

जपतेय मी मनापासून नाती भरजरी....

नाकर्तेपणाच्या अशा या जीवाला,

अशा करारात कधीही वेदनाच मिळतात,

आणि कृतिशिलतेच्या प्रयत्न प्रेरणेला,

पारितोषिकाचे आंदणच मिळतेय......

काय हवय अन काय नको

ते आपणच ठरवायचय

मनाचा आनंद कशात आहे

ते आपणच ओळखायचय.....


Rate this content
Log in