STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Others

4  

Neha Ranalkar(Nawate)

Others

दिखाऊपणा आणि सौंदर्य

दिखाऊपणा आणि सौंदर्य

1 min
314

सौंदर्य नसे रे वेशभूषेत !

ते असतेय साधेपणात!!१


खऱ्या निर्व्याज सौंदर्याला !

आरसा तरी हवा कशाला?!!२


सौंदर्य नसे नुसत्या नटण्यात !

असे फक्त नजरेला पटण्यात!!३


सौंदर्याची काय करू परिभाषा!

शृंगाराविना जो भावेल साजेसा!!४


असते निसर्गदत्त देणगी रूप!

नकोय शरिरावरती लेप खूप!!५


सौंदर्यास शालिन तीळ कोंदण!

नकोत कृत्रिम ते टॅटू वा गोंदण!!६


सौंदर्य असे स्मित हास्य शिंपण!

नसते चेह-यावरी लेपांचे लिंपण!!७


सौंदर्य हा नितांत सुंदरसा दागिना!

नको दिखावा भडकपणा साहिना!!८


सौंदर्या सलज्ज पापण्यांचा कौल!

सतेज चेहरा हवा नि ‍बांधा सुडौल!!९


मनाचे सौंदर्य ना ठरे कधी फोल!

नको लाड शरीराचे वा डामडौल!!१०


Rate this content
Log in