दीपावळीची पणती
दीपावळीची पणती
दीपावळी पहा हर्षली
वसंत ऋतुने नटली
चैत्र पालवी फुटली
हिरवळीने धरती सजली,
दिवे लाविते अंगणी
अमावस्येच्या दिवशी
झिलमिल दीप आकाशी
निसर्ग फुलला मनी...
झिलमिलत्या पणतीने
उजळू या हो ज्योती
ठेवू उघडे डोळे
दुर्जनाला ओळखूनी,
कर्तव्याच्या ज्ञानज्योती उजळूनी
उत्सव करू या
काळजाच्या देव्हाऱ्यात बसूनी...
अज्ञानाचे अंधकारातून
दूर करण्या घेऊ व्रत
निस्तज ज्योतीची
काजळी टाकू काढुनी,
प्रेमभावाच्या पणती
पेटवू जागोजागी
अंधश्रद्धेस देवू नका
थारा त्यास टाकू पुरुनी...
लावूनी भावनांचा आकाशदीप नभांतरी
पणती पेटवू आपल्या मनाच्या अंगणी,
येईल संस्कार घेऊन लक्ष्मीची पाऊले दारी
सजवा समाधानाची भावफुले रांगोळ्यानी...
