STORYMIRROR

Shobha Sanjay Bavdhankar

Others

4  

Shobha Sanjay Bavdhankar

Others

दीपावली

दीपावली

1 min
108

थंडीचा सुखद वारा  

अभ्यंग स्नानाचा प्रेमाचा मारा  


घराघरात पहाटे उटणं, तेल, सुगंधी साबणाचा वास 

प्रेमाची लाडीक जवळीक वाढवतो खास  


सप्तरंगाच्या रांगोळीवर इवल्याशा पणतीचा प्रकाश  

तोर्‍यात उभा दारावर आकाशकंदील झकास  


वाजतगाजत आली वसूबारस  

पूजा वासरु गाय  

बछड्यासाठी दुधदुभती राहो ही माय  


सनईच्या सुरात आली धनतेरस  

दिव्याची रोषणाई, घरात सुंदर आरास 

 

पुष्पवर्षावाने दरवर्षी लक्ष्मीपूजनाचा थाट  

लाडू, करंजी, अनारसे सजवायचे देवाजवळ ताट  


कानात होते कुजबुज अहो उद्या आहे पाडवा 

सौच्या उत्साहाला सागर भरती 

पतीदेव भेट देऊन करवुन घेतात आरती  


भाऊबीज आली घेऊन माहेरची हुरहुर  

वाट दिसते सासरच्या दारातून 

आगळावेगळा दीपावली सण 

ओथंबून वाहत राहते टवटवीत मन ॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन