दीप उजळू दे
दीप उजळू दे
दीप उजळू दे
दीप उजळू दे ज्ञानाचा
तमाला अस्तास नेऊन
कोपरा कोपरा हसावा
दीप गंगा घेता लेवून.............१
मनं मनाला जुळावी
जुन्या वादास विसरून
प्रत्येक नात्याने जुळावे
जिव्हाळा यावा बहरून..........२
लक्ष्मीचा निवास स्थापित
घरोघरी नित्य राहावा
काळजात आज नव्याने
माणसाच्या माणुस यावा..........३
मंदिरी आरास दिव्यांची
ज्योतिर्मय संसार व्हावा
गाभारीचा देव जागृत
दु:खी पीडितात बघावा..........४
स्वप्न पूर्णत्वास जावून
गाठावी मनीची शिखरे
मिटवावे त्या निराशेला
बंद व्हावी अश्रुंची दारे..........५
रूजो तोरण संस्कारांचे
वसा संस्कृतीचा देतांना
परंपरा जतन करू
दिपोत्सव हा करतांना............६
हृदयस्थ अभिमान ज्यांचा
तेवतो सदा स्मरणात
वीर सैनिकांच्या स्मृतीचा
दीप उजळू दे घरात............७
