दीप ....काव्यांजली रचना
दीप ....काव्यांजली रचना
1 min
309
दीप लागले
आज घरा घरात
अमावस्येची रात
उजळली
तिमिराचा जोर किती जरी वाढला
उजळून काढला
दीपाने
अंधारल्या मनास
आशेचा एक दीप
मोत्याचा सीप
भासला
दीप मांगल्यस्वरूप
देई तिमिरास मात
प्रकाश जीवनात
भरूनी
दीपाचा धर्म
स्वतः अविरत जळूनी
प्रत्येकाच्या मनी
वसतसे............
