ध्येय हेच आव्हान
ध्येय हेच आव्हान
ध्येय माझे गाठण्यासाठी|
होईल स्वप्न साकार||
खडतर असो चढण माझी|
घेईल नवा आकार||...(१)
येईल अपयश पुन्हा पुन्हा|
नाही घेणार मी माघार||
संकट असो कितीही|
मी बनणार स्वत: आधार||...(२)
लक्ष माझे यश गाठणे|
ध्येये हेच आव्हान||
यशासाठी तप मांडूनी|
मिळेल सफल वरदान||...(३)
ध्यास नवा जगण्याचा|
हि वेेळ मुुुुुुल्य आपुली||
संधीच सोनं करू या|
हे सत्व पुन्हा गवसली||...(४)
क्षमता असो धमणीत जागी|
बुध्दी तेज विचार सरणी||
महेनत माझी सिध्दीस येईल|
ध्येये हिच मागणी||...(५)
इमान असो कर्तव्याने|
बजाऊ सेवा जनतेची||
आव्हान माझे ध्येयस्फुर्तीचे|
ही उमेद जगण्याची||...(६)
