STORYMIRROR

sarika k Aiwale

Children Stories Children

3  

sarika k Aiwale

Children Stories Children

ध्यास एक शिक्षित व्हावे राष्ट्रजन

ध्यास एक शिक्षित व्हावे राष्ट्रजन

1 min
152

अडाणी होती माय माझी 

शिकली नाही अक्षर कधी 

धेय्य तिच्या एकच मनी 

शिक्षक असावी लेक माझी 


ध्यास तिचा होता खरा ही 

अडाणिपणाची दुखरी नस ती 

दुनियेच्या बाजारात नाही मिळत 

शिक्षण अक्षर शब्द अन् ज्ञान ही 


सावित्रीच्या लेकी आम्ही 

देवू घेऊ ज्ञानवसा अनमोल 

पेरून नविन विचाराचे बीज 

घडवू शिक्षित नव समाज ही


शिक्षक असे राष्ट्रचा पाया 

घडवी मुल्यवान माणूस जगी 

जसा आकार देई कुंभार मडक्यास 

देई नवी दिशा शिक्षक मुलांस 

  

ध्यास मनी एकच नित्य 

राष्ट्र घडावे शिक्षित सारे 

वाहू दे नव विचाराचे वारे 

व्हावे राष्ट्र सुशिक्षित सारे 


Rate this content
Log in