STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

3  

Meenakshi Kilawat

Others

धूंद होवूनी जगायचे

धूंद होवूनी जगायचे

1 min
226

श्वासातला सुगंध होऊनी 

प्रतीच्या मस्त उबेत डुंबायचे 

वेडे होवूनी या रानोमाळी 

चिंब होवूनी हिंडायचे..


नकळत हृदयात दोघांनी 

एकत्रच हसूनीया शिरायचे 

हृदयात पक्के स्थान मांडूनी

असे धूंद होवूनी जगायचे..


स्वप्नात वेदनाचा हा उतारा

डोळ्यात साथीने उतरायचे

पाझरणाऱ्या या अश्रूंमध्ये

सप्तरंगी इंद्रधनू सजवायचे..


केसांमधूनी पाठीवरूनी 

मंद झोताने ओघळायचे

रोमछिद्रे ही अंगावरची

थेंब थेंब अलगद साठवायचे..


वाऱ्याला श्वासात कवटाळूनी 

शिखरावरती उंच भरारी घ्यायची 

कुशीत ढंगाच्या शिरकाव करूनी

दामिनीसमं चमकूनिया तळपायचे..


पाऊस अन् मी पक्के मित्र 

मज पाऊस व्हायला आवडायचे

भिजून बरसायचे सोबत मनसोक्त

अलगद पाऊसावरच रूळायचे..


Rate this content
Log in