धूलिवंदन....
धूलिवंदन....
1 min
346
होळीचा दुसरा दिवस..
धूलिवंदन येता दारी
होळीची जळणी राखही
लावे एकमेकांच्या अंगावरी...
लहान थोर करती मस्ती
रंगीबेरंगी रंग घेऊनी
तुझ्यासवे खेळेल मी
समता,स्वातंत्र्य, एकात्मतेची आण घेऊनी
तु लाव रंग मजला केसरी..
मी ही लावील हिरवा तुजला..
तुझ्यासवे धुलीवंदनचा आनंद घेईन
गळाभेट देशील ईदीसाठी मजला..
जरीही रंगीबेरंगी धुळवण असली..
आपली संस्कृती आपण जपुया..
तुझे माझे संस्कार खरे...
हिंदु-मुस्लीम एक होवू या...
तिरंग्यामधले तीन रंग
त्याच अर्थाने वागू या...
आपण सर्व भारतीय आहोत..
याची जाण मात्र मनात असू द्या...
