धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना
धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना
फुलपाखरू प्रेमाचे मनी फुलले
वेड्याखुल्या जीवास सुखात रमवले
भावनांचे डोह रंगीन संगीन सजवले
धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना
छंद सहवासाचा बेधुंद जडला
आस्वाद मायेचा धुंदीत गवसला
सुगंध आठवणींचा बेमुराद दळवळला
धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना
स्पर्श समाधानाचा काहूर आनंदला
निस्वार्थ प्रेमाचा खजिना लुटला
धुंदीत क्षणांच्या जीव कासावीस झाला
धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना
हास्याच्या गर्तेत लोभस स्मित उमटले
नयनलोचन भाबडे अचंबित न्हाहले
साथ विश्वासाची प्रेमळ जोपासली
धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना
