धुंद तुझ्याच प्रीतीत
धुंद तुझ्याच प्रीतीत
धुंद, तुझ्याच प्रितीत,
सखे , ध्यान ही गुंतले !
सुचतच, नाही काही ,
मन, वेडेपिसे झाले !!1
वाटे, तुलाच पहावे,
एकटक, अविचल !
ठाम, राहिन निश्चये,
सांभाळुनी, तुझा ताल !!2
गाल, गोबरे गुलाबी,
हरिणाक्षी, नेत्र तुझे !
ओठ, डाळिंबी रसीले,
भान, हरपते माझे !!3
तुझ्या, गालावरी खळी,
हसतांना, जीवघेणी !
शुभ्रदंत, ते मोतीया,
गाती, मिलनाची गाणी !!4
तुझ्या, कोमल कायेचा,
स्पर्श, करी गदगद !
मोरपीस, तनुवरी,
मज, वाटतो सुखद !!5
क्षण, मिलनाचा येता,
हळुवार, पकडावा !
वाटे, सतत मिळावा,g
तुझ्या, बाहुत विसावा!!6
सुख , दु:खाचे प्रसंग,
येती, आपल्या जीवनी!
तुझ्या संग, सोबतीने,
भार, संसारी वाहुनी !!7
