धुंद झाल्या दिशा
धुंद झाल्या दिशा
1 min
304
बरसल्या पावसाच्या धारा
पसरे मृद्गंध चोहीकडे
धुंद झाल्या दिशा क्षणार्धात
भिजून चिंब झाली धरणी
आनंदली सृष्टी सर्वांगात
संधिकालही आला जवळी
पाखरे परतली खोप्यात
अंधारून येता ती रजनी
जाई रवी क्षितिजापल्याड
पल्लवीत होता आशा मनी
सांजवात लागे देव्हाऱ्यात
रातराणी आली बहरूनी
दरवळे गंध दारोदारी
शृंगाराचा चढवीत साज
करी चाफेकळी बरोबरी
