धुक्यात हरवली वाट...
धुक्यात हरवली वाट...
1 min
401
धुक्यात हरवली वाट
किती करू मी पायपीट
नागमोडी ग पायवाट
त्यात उंच-उंच घाट
हरवली यात जणू
माणुसकीची ही लाट
लागली कित्येकांची
त्यात पुरती वहिवाट
आता तरी सुधर रे माणसा
हाव खूप आहे वाईट
आजकालचा जमाना
घेत नाही काही लाईट
जसे पेरू तेच उगवेल
आहे आताच हाताशी वेळ
नाहीतर होईल फार रे उशीर
तू घाल चांगल्याच आता मेळ
धुक्यात हरवली वाट
होईल सगळं निर्मळ जेव्हा
नष्ट होईल एकमेकांतला भेद
तेव्हा मनी जागेल नवीन उमेद
