STORYMIRROR

शिल्पा म. वाघमारे

Others

3  

शिल्पा म. वाघमारे

Others

दहशतवाद....

दहशतवाद....

1 min
197

दहशतवादरुपी अजगराचा

दिवसागणिक घट्टच वेढा

देशसुरक्षा, विकास, क्रांती

सुटेनाच गुंतलेला तिढा... 1


धर्म नि सत्तेच्या हव्यासापायी

दृष्टी त्यांची क्षीण झाली  

 संवेदनांची हिरवळ सुकली

सैल माणुसकीची वीण झाली...2



एक एक पाऊल पुढे टाकून

छुप्या हल्ल्यांचे त्यांस भूषण आहे

मुँह मे अल्ला,अन् भ्याड हल्ला

 मानवजातीस महत् दूषण आहे... 3


कळीकाळही कोपला आहे

अजब फतवा काढला आहे

घोर संहार अटळ *सत्याचा*

 हा निरोप कलीनी धाडला आहे.. 4


मेघ कुट्ट दाटलेले नभी नि

माथ्यावर तलवार आहे टांगती

जय सर्वदा सत्याचाच होतो

 गतकाळानुभव आम्हा सांगती... 5


आता मनगटातील जोर आमच्या

 दाखवल्यावाचून कळणार नाही

 या मातेच्या पदराला शिवणारांचे

 मस्तक धडावर टिकणार नाही...6


जरी उभे न त्या सिमांवरती

आम्ही भारतीय युवाशक्ती

हाणूनच पाडू डाव रिपुंचा

बळ देई सदोदित देशभक्ती... 7




Rate this content
Log in