धरती
धरती
1 min
147
आम्ही तुझ्या पोटी जन्मलो,
तुझ्या प्रेमळ कुशीत वाढलो,
तुझ्याच हातात एवढे मोठे झालो!
तू दिलेस भरभरून दान प्रत्येकवेळी
अन्न ,पाणी ,निवारा अन शुद्ध हवा वेळोवेळी
तू रक्षकच आमची धरणी माते!
पण कशी मानवाने बदलली खेळी
ओरबाडून तुझी संपत्ती ऐन वेळी
केले तुलाच निर्धन कंगाल वेळोवेळी !
तु आमच्या हातात सत्ता दिली अन्
तुला लुटणे ,वापरणे ,चालू स्वार्थापायी !
कुठे, कधी फेडणार धरणीमाते ,आम्ही हे पाप?
पालनकर्त्या मातेचे आम्हा नकोत शिव्या शाप!
तुझी काळजी घेऊ आम्ही जाणीव झाली
चिंता नसावी, तुझे ऐश्वर्य आणू माघारी!
