STORYMIRROR

SANJAY SALVI

Others

3  

SANJAY SALVI

Others

धरती

धरती

1 min
545

निळ्यानिळ्या नभाखाली धरतीही विसावली,

जलधारा पावसाच्या पिऊन ती सुखावली,


प्रेम रूपे तिच्या कांती हिरवळ बहरली,

निळ्यानिळ्या नभाखाली धरतीही विसावली,


उदरात सामावले सागराचे पाणी फार,

त्यात सुखाने नांदते जीवश्रुष्टी जलचर,


निळ्या निळ्या नभाखाली धरतीही विसावली,


नदी नाले ओढे तिच्या पाठीवर खळाळती,

नानाविध फुले फळे गाली तिच्या फुलविती,


निळ्यानिळ्या नभाखाली धरतीही विसावली,


पशुपक्षी वनचर इथे मस्तीत रमती,

वृक्षवल्ली झाडेमाडे वाऱ्यासंगती डोलती,


निळ्या निळ्या नभाखाली धरतीही विसावली,


उंचावरल्या आभाळाही ओढ आहे या धरेची,

मानवा तू ठेव लाज पायाखालच्या मातीची,

मानवा तू ठेव लाज पायाखालच्या मातीची.


Rate this content
Log in