धरणी
धरणी
1 min
26.6K
भेगाळली वसुंधरा
तहानली कैक काळ
गारपिट अधेमधे
निसर्गाची ही अबाळ
कशामुळे झाले सारे
शोधताहे उत्तर मी
गरीबाच्या झोपडीचे
उतावीळ छप्पर मी
सिमेंटांच्या जंगलात
हरवून गेली धरा
ऋतूचक्र बदलती
माणसाचा खेळ सारा
निसर्गाचा -हास होई
वृक्षतोड विकासाला
स्वार्थासाठी अवनीचा
जगताने घात केला
हिरवळ हरवली
दुष्काळाचे हे डोहाळे
दारूकाम गल्लोगल्ली
प्रदूषित हे सोहळे
काहीतरी करा आता
सगळेच एक होऊ
सावलीची डेरेदार
आसमंती झाडे लावू
