धोरण
धोरण
1 min
206
त्यांनी नाकारले म्हणून अस्तित्व असत नाही का
त्यांच्या मान्यतेची गरज अपरिहार्य भासते का
त्यांची मोजमापे मान्य न मला प्रस्थापित व्हायला
माझे स्वतःचे कायदे कानून न्याय तो करायला
कळप त्यांचे त्यांनी सांभाळलेले ते घुटमळती
इशारे मिळताच सूर तो मिळवून वाचाळती
अजेंडा त्यांचा वेगळा विभाजन त्यांचे लक्ष्य आहे
बहुमताचा करून उपयोग केले भक्ष्य आहे
लोकही कसे वाहवत गेले सवंग घोषणांनी
ध्रुवीकरण धर्माचे आता भडकाऊ भाषणांनी
तटस्थ असणारे भोगती दोहींकडून अन्याय
झुका तरी एकीकडे मागती समर्थन शिवाय
