धन्य ती भाऊसाहेबांची जन्मभूमी
धन्य ती भाऊसाहेबांची जन्मभूमी
भाऊसाहेबांच्या जन्माने ही पावन झाली धरणी|
महाराष्ट्राच्या परिवर्तनाची त्यांनी मांडली विचारसरणी||
ज्वलंत त्यांचे विचार कार्य आहे आज अमर|
भाऊसाहेबांच्या पुण्याईने मिळाला कित्येकास आधार||
जागोजागी शिक्षणाची आज वाहते ज्ञान गंगा|
भाऊसाहेबांच्या दातृत्वाची किर्ती पोहचली या जगा||
जनामनातले निर्भीड नेते हिरे आहेत नामवंत|
भाऊसाहेबांच्या पदस्पर्शाने झाली मातृभूमी भाग्यवंत||
रक्तात त्यांच्या होती असीम देशभक्ती|
कष्टातून घडवली त्यांनी समाज जाणिवेची क्रांती||
गुणी उधार ते संस्काराचे मोती भाऊसाहेब होते|
संस्थेत त्यांच्या कला कसबाचे कलावंत आज नांदते||
उत्तर महाराष्ट्राचे शिल्पकार ते प्रिय भाऊसाहेब लाभले|
शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी ते दिन रात जागले||
नाही थकले कार्यात, सदा नि:स्वार्थ निर्भीड लढले|
महाराष्ट्र अस्मितेचे असे प्रिय भाऊसाहेब आम्हा मिळाले||
सत्ता संपत्तीचे लोभी, नव्हते होते शब्दांचे ते धनी|
शाहू, फुले, आंबेडकरांचे कार्य भाऊसाहेबांचे लागले मनी||
धन्य ती भाऊसाहेबांची जन्मभुमी...|
त्यांच्या उदात्त कार्याला माझी सलामी...||
