दहीहंडी
दहीहंडी
1 min
317
श्रावण अष्टमीच्या दिवशी
गोकुळात जन्माला श्रीकृष्ण
अवघा विश्व आनंदी झाला
सुटला साऱ्यांचा जटिल प्रश्न
याच आनंदात सारे झाले
मोठ्यासंह लहान मुले गोळा
साऱ्यांनी मिळून विचार केला
साजरा करू या गोपाळकाला
कुणी आणले दहीपोहे तर
कुणी लाह्या मुरमुरे आणले
सारे एकजीव करून काला
हंडी उंच दोरीवर टांगले
एकावर एक उभे राहून
गोपाळ करती उंच मनोरा
छोटासा कृष्ण चढतो वर
प्रयत्न करतो पकडण्याचा दोरा
अंगावर फेकती कुणी पाणी
वाजू लागते मग खूपच थंडी
एकच ध्यास बाल गोपाळाना
अनेक प्रयत्नाने फोडतात दहीहंडी
