धडा निसर्गाचा
धडा निसर्गाचा
1 min
271
निसर्ग नाव प्रलयंकारी चक्रीवादळा
निसर्ग रम्य कोकणाची बदलली कळा
पश्चिम किनारी धडकले भारत देशी
नारळी पोफळी बागांची वाताहत ऐशी
ध्वस्त झाले निवारे अन स्वप्ने पाहिलेली
हरविली दिशा माणसे हताश झालेली
उफळला सागर रौद्र रूप धारलेला
वाहून गेल्या काठांना विरूप ठरलेला
पुन्हा घ्यायची उभारी शिकवी निसर्ग
करायचा श्रमाने कोकणचा स्वर्ग
