STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Others

4  

Neha Ranalkar(Nawate)

Others

धैर्य

धैर्य

1 min
234

नसता धैर्य अवसानच गळते!

भीतीने त्याची बोबडी वळते!!१


ब्रह्मराक्षस लागे त्याच्या पाठी!

साहसी घेतसे हातातच काठी!!२


यशाचे अत्त्युच्च शिखर गाठी!

आकाश मर्यादा धैर्यवानासाठी!!३


भीती देशास्तव लढणार नाही!

शौर्य रणी शत्रूशी झुंज देत राही!!४


संकटापुढे भीत्रा काढी मग पळापळ?

साहस करते मात एकवटून बळ!!५


वेदनेने हलकी उठताच मग कळ!

भीत्रा भीतीनेच माजवी खळबळ!!६


शूर सामोरा जाऊन राहतो अटळ!

धैर्यवानाला मिळे उर्जा नसे तळमळ!!७


धैर्य मानवाला लढायला शिकवते तर भीतीनं त्याची गाळण उडते व झुंजण्याचे सामर्थ्य नाहिसे होते. साहस वीरांना देशास्तव शत्रूशी समर्थपणे लढायला शिकवते. भीती मानवाला पळपुटेपणा करायला भाग पाडते. उगाच नाही भित्यापाठी ब्रम्ह राक्षस म्हणत!



Rate this content
Log in