STORYMIRROR

Rohit Khamkar

Others

3  

Rohit Khamkar

Others

धारा

धारा

1 min
449

तापलेल्या गार कराया सुटलाय वारा, लागलीच कोसळतील हलक्याश्या धारा.

काय उन्हाचा चढलाय पारा, तूझ्या तापनीला आता नाही थारा.


कुणी स्वखुशीने कुणी जबरीने घालतील फेरा, तू मात्र हसत मिरवशील तोरा.

तिथ शेतकरी बसलाय कोरा, कोसळ एवढ की बांध सुध्दा पेरा.



आता सगळ्यांनीच घेतलाय आसरा, परी मोरांचा फुललाय पिसारा.

हुशारी करणाऱ्यांनाच विचारा, कश्या फसवतात कोसळणाऱ्या धारा.


Rate this content
Log in