धागा अंतरीचा
धागा अंतरीचा
ऋणानुबंधाच्या गाठी,कशाचं ह्या जुळल्या रे!
भाव मनीचे प्रगट,होता दुःखं विरले रे !! धृपद!!
कुठे होतॊ कसा होतो,हे नं मजला कळले!
गाठी भेटी होऊनी त्या,धागे कसे हे जुळले!
कुठे होतो कसा होतो,भेटलो कसाचं मी रे!!१!!
मोबाईलचां जमाना हा ,कशी नाळ जुळलीरे!
माझे मलाच कळेना,पुण्य कसे फळले रे!
काव्य छन्द जोपासित,कसा ईथे रुळलो रे!!२!!
अनेक ह्यां जाती पाती, धर्मं प्रेमिशी मिळलो!
विविधांगी परंपरे , एक होऊनी जुळलो!
काय म्हणावे सुचेना, प्रेम रंगी रंगलो रे!!३!!
काव्य करीता असा मी, हा एक होऊनी गेलो!
आकाशाच्या रंगा मध्ये,निर्भयं होवोनि गेलो!
काळ्या ढगांच्या मधुनी बरसत मी आलो रे!!४!!
वैष्णवांच्या मेळ्या मध्ये,ऋणानुबंध जुळले!
सारासारं विचार हे, संबंध प्रेमी बनले!
त्या नात्याची वीण अशी,घट्ट कशी जुळली रे!!५!!
प्रेम धागा अंतरीचा,जुळता होय सारे हे !
सर्वं मिळोनि विश्वा, वसुधैव कुटुंब हे !
संतदास म्हणे माझे, हेचि पुण्य फळले रे!!६!!
