STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

दहा एप्रिल

दहा एप्रिल

1 min
208

पं चायती नसत्या करण्याची

ध डपड सदा चालू असते

रा ग लोभ मत्सर जोपासण्याची

व्या धी सदैव डोके वर काढते...


दि वे लागले म्हणून निदान प्रकाशात 

व ळचणीतले चेहरे तरी दिसले

सा ळसूद पणाचा आव आणणारे

ची रकूट मच्छर तरी कळले....


सु ज्ञास सांगणे न लगे

प्र ज्ञावंताची साधी सोपी मनोकामना

भा ग्य पहा आपले किती थोर

त क्षणीच पळू लागला की हो कोरोना....


कोणी काही ही म्हणो

जे होते ते चांगल्याच साठी

तो आहेच सदैव पाठी

आरोग्यसंपन्न जीवन देण्यासाठी....!


Rate this content
Log in