देवा तु गजानना
देवा तु गजानना
1 min
224
विजेचा ताशा कडाडला
ढगांचा ढोल गडाडला
वरुणाच्या वर्षावाने
आला गणराज आला ।।1।।
सजली धरती सारी
दुमदुमला आसमंत
गोडवा गात भक्तगण
आला विघ्नहर्ता आला ।।2।।
सजवून धजवून मखरात
लाडक्या बाप्पाला बसविले
गोड मोदकांचा नैवेद्य
त्यास अर्पण केले।।3।।
आला भक्तांना दर्शन देण्या
आला लाडका लंबोदर आला ।.ध्रु।।
