देवा ज्योतिबा चांगभल ----
देवा ज्योतिबा चांगभल ----
चांगभल रं चांगभल देवा, ज्योतिबा चांगभल || धृ ||
चांगभल रं चांगभल, केदारनाथा चांगभल
चांगभल रं चांगभल, भैरवनाथा चांगभल
चांगभल रं चांगभल, देवा ज्योतिबा चांगभल || १ ||
गुलाल उधळत भावभक्तीने, दर्शन घ्याया आलो रं
वाडी रत्नागिरी मंदी राजा, राहिलाय डोंगरावरी रं
तुझ्या नावाचा डंका रं देवा, बारा ज्योतिर्लिंगामधी
नऊ खंडाचा तु रं स्वामी, कुलदैवत आमचं तु रं
किरपा तुझ्या दृष्टीची, ऱ्हावू दे आमच्यावरी रं || २ ||
चांगभल रं चांगभल, देवा ज्योतिबा चांगभल
मन हे झाल येडखुळ, दर्शन घ्याया तुझ रं
हात आमचा जुळ रं देवा,मान झुकतिया तुझ्या म्होर रं || ३ ||
चांगभल रं चांगभल, देवा ज्योतिबा चांगभल
