देवा धी देवा तू गणराया
देवा धी देवा तू गणराया
देवाधिदेवा तू गणराया
महिमा तूझा महान
देवादिकांच्या पूजेत बाप्पा
तुझाच पहिला मान ।।धृ।।
सिद्धिविनायक तू गणनायक
सकलांचा स्वामी
तूच जगाचा चालक पालक
तूच अंतर्यामी
गौरीनंदना हे गजवदना गातो तुझे गुणगान
देवादिकांच्या पूजेत बाप्पा तुझाच पहिला मान ।।1।।
आज गणेश चतुर्थी येणार
घरी मंगलमूर्ती
पंचप्राणाच्या लावून ज्योती
ओवाळीन मी आरती
तुझीच सेवा घडूदे देवा दे ऐसे तू वरदान
देवादिकांच्या पूजेत बाप्पा तुझाच पहिला मान ।।2।।
तूच एक त्राता भाग्यविधाता
भक्तांच्या तूच वाली
धाव पाव रे हे एकदंता
वेळ कठीण ही आली
तुझ्या कृपेने संकटाचे सुटुदे सारे हे गिऱ्हाण
देवादिकांच्या पूजेत बाप्पा तूझाच पहिला मान ।।3।।
