"देव मी पाहिला माणसात"
"देव मी पाहिला माणसात"
दिवसरात्र कष्ट करून धान्य पिकवितो शेतात,
देव मी पाहिला अशा त्या बळीराजात...।।
बालकाला मोठे करण्याकरिता कष्ट सोसती अपार,
देव मी पाहिला त्या कष्टणा-या माता अन पित्यात...।।
मातृभूमिच्या संरक्षणाकरिता सिमेवर लढती अहोरात्र,
देव मी पाहिला अशा लढणा-या सैन्यात ...।।
लोकांचे प्राण वाचविण्यासाठी राबतात जे हात,
देव मी पाहिला अशा आरोग्य कर्मचार्यांत...।।
परिसर स्वच्छ ठेवण्या असतात सदैव तत्पर,
देव मी पाहिला अशा सफाई कामगारांत...।।
विद्यादानाने देशाचे भविष्य घडविले ज्यांनी,
देव मी पाहिला अशा गुरूवर्य शिक्षकांत ...।।
दुसर्यांचे सुखात सुखी ज्यांचे मन,
देव मी पाहिला अशा प्रत्येक मनात...।।
देवाचे खुप उपकार आहेत आपल्यावरी,
माणसांच्या रुपांनी देवची अवतरला भुतलावरी...।।
