देव माझा
देव माझा
1 min
378
तूच माझा साथी देवा
तूच माझा सोबती
जगण्याची वाटेवरती
तूच माझा सारथी
कसा करू हेवा आता
तूच भाग्यविधाता
माझ्या नशिबाचा
तूच कर्ताकरविता
मायेची सावली तू
अंधारात उजेड होता
दुःखाच्या या दुनियेत
तूच एक सुख होता
संकटास धावला तू
मित्र माझा देव होता
लंगडयाची काठी
आंधळ्याचा डोळा होता
जगण्याचा आधार तू
बाप माझा देव होता
वात्सल्याची मुर्ती तू
आईच्या रूपात होता
