STORYMIRROR

Suresh Kulkarni

Others

4  

Suresh Kulkarni

Others

देऊळ बंद !

देऊळ बंद !

1 min
147

घेऊनि ओझे चिंतांचे 

येतो नित्य तुझ्या दारी 

सांगूनि नाना व्यथा तुला

जगाची करतो कागाळी


कान तुझे हे असतील किटले

आली कटकट माघारी

पण नाही कुणी सखा स्वामी

तुजवीण दुजा या संसारी


नको रे बंद करुस ते दार 

नको रे बंद करुस ते दार

तूचि माझ्या जीवनातला

एकमेव आधार 

नको रे बंद करुस ते दार !


साहित्याला गुण द्या
लॉग इन