STORYMIRROR

Deepak Ahire

Others

2  

Deepak Ahire

Others

देणं...

देणं...

1 min
57

जगण्याला घेण्याने नाही तर,देण्यानेच येते समृद्धी,

देण्याचेच येते दिवसेंदिवस,सुखासमाधानात वृद्धी

तुमचं आजचं देणं असतं,उद्यासाठी केलेली पेरणी,

जे असेल ते देत राहा, भांडार भरेल तुमचे आनंदानी

ज्ञानाचा साठा करून काय उपयोग,लोकांना ज्ञान रहा वाटत,

दान दिल्याने होत नाही कफल्लक,देणाऱ्याचे मात्र नाही सरत

स्वतःपुरतं कमवताना,दुर्लक्ष होतं सामाजिक जबाबदारीकडे,

पराभव विजयापेक्षा मोठे, इतरांच्या भल्यासाठी हरण्याकडे


Rate this content
Log in