देह देवाचे मंदिर
देह देवाचे मंदिर
1 min
190
स्वच्छ असे तन-मन
पावित्र्याने पुजण्यास,
देह देवाचे मंदिर
देवरूपी वंदन्यास. ..१..
घर मंदिर देवाचे
प्राण आपुले देहात,
गुण देवाचे दिव्यत्व
माझ्या जीवा उतरोत. ..२..
सत्संगाच्या स्वरूपात
असे भक्तांचे ठिकाण,
मन विश्रांतीचे स्थान
देह मंदिर महान. ..३..
भक्ति भावाने करूया
सारे मनन चिंतन,
असो पूज्य देह जरी
करू निष्ठेने जतन. ..४..
ग्रंथ संपत्तीने पूर्ण
सज्ज मंदिर ज्ञानाने,
ज्ञानदान करू आज
शुद्ध मनी भावनेने. ..५..
