डॉक्टर म्हणजे देव
डॉक्टर म्हणजे देव
1 min
201
प्रकृती जरा अस्वस्थ होई
लगे डॉक्टरची आठवण येई
धावत पळत दवाखान्यात जाई
डॉक्टर मग तपासून पाही
कोणता रोग काय इलाज
डॉक्टरांना हे सर्व कळे
दुसरा देवच आहे डॉक्टर
रोग्यांना दुसरे जीवन मिळे
डॉक्टरांच्या हातून घडत असते
नकळत अशी समाजसेवा
स्वार्थीपणा सोडून केले काम
तेच डॉक्टर असे समाजाचा ठेवा
भोळ्या लोकांना फसवू नका
महागडे उपचार सांगू नका
देवानंतर आहे तुमच्यावर विश्वास
विश्वासघात कुणाचा करू नका
