डॉक्टर आनंदीबाई जोशी
डॉक्टर आनंदीबाई जोशी
माहेरची ती यमुना
सासरची ती आनंदी
गोपाळ जोशी भ्रताराची
ती होती अर्धांगी
बालपणीच विवाह
बालपणीच बाळंतपण
पहिला पुत्र झाला
परमेश्वराला अर्पण
बसला घाव काळजात
डॉक्टर होण्याची
वाढली कामना
पाठीशी उभे राहुनी
पतीनेही दिली प्रेरणा
कार्पेंटर बाईनी दिली साथ
काही लोकांनी दिला हात
खूप सोसले हाल
सोसले अपार कष्ट
परंतु स्वतःचा धर्म
होऊ दिला नाही भ्रष्ट
नाही केला तिने बदल
आपल्या आहार-विहारात
पण त्यामुळे तिचा
क्षयाने केला घात
देशविदेशात तिला मिळाला
कुचेष्टा आणि अपमान
पण तिनेच मिळवून दिला
देशाला सन्मान
ती हुषार मोठी बुद्धीमान
स्मरणात राहील निरंतर
आनंदीबाई जोशी भारताची
पहिली महिला डॉक्टर
