STORYMIRROR

Deorao Chide

Others

3  

Deorao Chide

Others

डोंगर वाट

डोंगर वाट

1 min
435

वाट डोंगर माथ्याची

कशी आड वळणाची

कुठे चढ - उताराची

कुठे खाचं - खपारीची !


   श्रावणातील डोंगर वाट

   जसा पठारांचा भांग

   दुतर्फा तीच्या पसरली

   हिरव्या गालीच्याची रांग !


श्रावणात पाऊस धारा

बरसती डोंगर - वनी

लोट निघतो वाटेवरूनी

जशी सळसळते नागीन फणी !


    उंच हिरव्या डोंगरी

    झाडे - झुडपे, नागवेली

    बहरली वाट पानांफुलांनी

    हिरवळ चहूकडे पसरली !


Rate this content
Log in