STORYMIRROR

Latika Choudhary

Others

2  

Latika Choudhary

Others

डहाळी

डहाळी

1 min
2.7K


नदीकाठचं बहरलेलं झाड

डवरलेली हिरवी फांदी

वाऱ्याच्या झोतात डोलत

करून देत होती 

आपल्या अस्तित्वाची जाणीव....!

खोलवर मूळं भुईखालची 

जगण्यासाठी ग्रीष्मातही

पाळेमूळे रुजवत विचारांची

पकड घेत होती धीटाईने

वादळातही वसंतातल्या ......!

धुळवडा उडवणारे भोवरे

उन्मळून टाकणारी वादळे

अकस्मात धडक देत

यत्न करीत होती उपाटायचा

बुंध्यासंकट,करण्यासाठी नेस्तनाबूत.....!

वादळेच ती बेभरवशाची

नेतीलही वाहुन सारे काही क्षणात

विचारात या घेऊन सोंग

नाचण्याचे,हळूच बीजकण

धरेला सोपवित होती

जन्मावी म्हणून पुन्हा पुन्हा....!


Rate this content
Log in