डबघाई
डबघाई
1 min
438
डबघाईला आला शेतकरी
करतो जिवाची मरमर
पीक नाही पाणी नाही
जीवाला लागली करकर....
दुष्काळाचं सावट सारं
लेकरं राहती उपाशी
कर्जापायी कंबरड मोडलं
अन सावकार तुपाशी....
महागाई वाढली खूप
शेतक-याच्या नाकी नऊ आले
जे पिकलं ते सारंच
कर्जापायी गेले....
रोजचं मरण डोक्यावर
घेवून कसाबसा जगतोय
बँकेवाल्याला सुध्दा
फक्त शेतकरीच दिसतोय...
शेतमालाला भाव नाही
गुरांढोरांना चारा नाही
डबघाईला आला शेतकरी
जिवास त्याच्या आराम नाही...
