दैवी कवडसा
दैवी कवडसा
1 min
364
दहा वर्षांनी सांगितली मला तिने गोड बातमी
ज्याची मी कधीपासून वाट पाहत होतो
जीवनात आला आनंदाचा कवडसा
सारे कुटुंब झाले मनापासून खुश
आनंदाचा हा कवडसा सर्वांनाच आवडला
देवधर्म , पूजाअर्चा सारे काही
करून आम्ही थकलो होतो
निराशा पदरी बाळगून
दुःखी मनाने गप्प बसलो होतो
अचानक झाला हा चमत्कार
अंधारलेल्या जीवनात आला
प्रकाशाचा दैवी कवडसा
ज्याच्यामुळे मिळाले सुख
आणि समाधान आई बाबा होण्याचा सन्मान
