दाटल्या सावल्या
दाटल्या सावल्या
1 min
379
दाटल्या मेघातूनी तू होऊनी सरी बरसत रहा
खुणा दाटल्या पापणीत असे तू मनी साठत रहा
दाटल्या सावल्यास तू अंधाराची ओळख दाव
भयास नभीच्या त्याही काळोखाची सवय लाव
दाटल्या मनी दवे शुभ्र धुक्याचे झेलीत बहरत रहा
पाऊलखुणा येती मागं खुशाली तयास पुसत रहा
दाटल्या मेघातूनी तू होऊनी सरी बरसत रहा
खुणा दाटल्या पापणीत असे तू मनी साठत रहा ...
