दाम करी काम
दाम करी काम
राबराबतो कष्टकरी
शेतकरी गाळतो घाम
खुर्चीत बसून मस्त
साहेब करी आराम
गलेलठ्ठ पगार वर
टेबलाखालून मिळे दाम
देणाऱ्यांचा इलाज नसे
म्हणत दाम करी काम
स्वार्थाच्या या बाजारात
नाही कशात उरला राम
पैशास्तव लिलाव स्रीत्वाचा
वारांगना मागती उच्च दाम
लंपट कामांधांना येथे
कुणी घालीना का लगाम
जिंकण्या येथे निवडणूक
सत्तेसाठी घालती रामराम
गरज संपताच विचारती
तुमचे येथ काय काम
उघड तरी डोळे आता देवा
तुच मुकुंदा तु रे घनश्याम
देई यांना दंड तो उदंड
दाखवी भेद साम दाम
बदलून टाक सारं काही
कशात तरी राहू दे राम
