चूक की माफी...
चूक की माफी...
1 min
324
शंभरदा चुकले असेल मी
हजारदा धडपडले असेल मी
अनेकदा विव्हळले असेल मी
आठवणीत अडकले असेल मी
एकांतात विचलित झाले असेल मी
शोधात माझ्या भटकले असेल मी
अनेकांना भरपूर परिक्षिले असेल मी
कधी कुणास उपेक्षिलेही असेल मी
विश्वासाला खूपदा तासले असेल मी
मात्र माफीस एकदा पात्र असेल मी...!
